
Maharashtra Weather
esakal
हायलाइट्स
अरबी समुद्रात ‘शक्ती’ चक्रीवादळ तयार; महाराष्ट्र किनारपट्टीवर ४५ ते ६५ किमी वेगाने वारे व उंच लाटा उसळण्याची शक्यता.
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन सतर्क; मच्छीमार व पर्यटकांना समुद्राजवळ न जाण्याचे आवाहन.
१० हजार हेक्टरवरील भातपिकासमोर संकट; कापणी लांबल्याने रब्बी हंगाम उशीराने सुरू होणार.
Alert For Cyclone Shakti : अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘शक्ती’ चक्रीवादळाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग प्रशासन सतर्क झाले आहे. समुद्रात ताशी ४५ ते ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात शनिवारी विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. पुढील तीन-चार दिवस पावसाचा अंदाज असल्याने जिल्ह्यातील दहा हजार हेक्टरवरील भात पिकासमोर संकट उभे राहिले आहे.