

Villages in the Western Ghats
sakal
एक पिढी आपले मूळस्थान सोडून शहरात वाढली आहे. याचा परिणाम भाषा, लोकपरंपरा, शेती, पशुपालन, वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैली या सर्वांवर होणार असून, एका संस्कृतीचे अस्तित्व संपण्याचा धोका आहे. त्यादृष्टीने विचार करून पश्चिम घाटातील तालुक्यांमध्ये पर्यवरण संवर्धनाबरोबरच शाश्वत रोजगार निर्माण करण्याची गरज आहे.