

Mahayuti victory municipal elections
esakal
BJP Shiv Sena NCP Mahayuti Success : पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय पटावर लक्ष लागलेल्या आणि तीन मंत्र्यांसह खासदार, आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप–शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुती भारी ठरली. महायुतीने महापालिकेवर सत्ता काबीज करत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले. महापालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच महायुती म्हणून भाजपसह सत्तेत आलेल्या राष्ट्रवादीचा नवा अध्याय आता सुरू झाला आहे.