किरण माने म्हणाले, "छावा सिनेमाच्या माध्यमातून समाजात दुही माजविण्याचा प्रयत्न सावंत यांनी हाणून पाडला. त्यामुळे कोरटकरच्या माध्यमातून त्यांना धमकी देण्याचे कृत्य घडले."
कोल्हापूर : धमकीच्या प्रकारांना प्रत्येकालाच सामोरे जावे लागणार आहे. परंतु, थांबून चालणार नाही. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांच्या रूपाने क्रांतीला सुरुवात झाली आहे. या क्रांतीचा वणवा पेटला पाहिजे, असे प्रतिपादन अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) यांनी येथे केले. तसेच शिवराज्याभिषेकावर लवकरच एकपात्री नाटक करू, असेही त्यांनी जाहीर केले.