
"शिवाजी विद्यापीठ हेच नाव निश्चित करण्यामागील उदात्त विचार, विद्यापीठासाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनी या सर्वबाबींवर दृष्टिक्षेप टाकला, तर ‘शिवाजी विद्यापीठ’ हेच नाव योग्य आहे."
कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचे ज्ञानपीठ हे शिवाजी विद्यापीठ (Shivaji University) आहे. त्याचा नामविस्तार करण्यात येऊ नये. ‘शिवाजी विद्यापीठ’ हेच नाव कायम राहावे, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ (Castreib Employees Federation) आणि शिवप्रेमींनी केली आहे.