
Kolhapur Crime : गौरव डोंगरे : शेअर मार्केटचा क्लास काढला...शिकायला येणाऱ्यांना गुंतवणूक करायला भाग पाडले...शाहूपुरी, बाबूजमाल परिसरातील हे क्लासचालक रात्रीत पसार झाले. दुसरीकडे दुप्पट ते चौपट परतावा देण्याच्या नावाखाली मोठमोठ्या कंपन्यांनी रात्री गाशा गुंडाळून पोबारा केला. काही दिवस पसार झाल्यानंतर यातील एजंट आता उजळ माथ्याने वावरू लागले आहेत. ए. एस. ट्रेडर्स, ग्रोबर्झ, मेकर ॲग्रो कंपनी, रचना ॲग्रो कंपनी, प्राईम ॲग्रो कंपनी, वेल्थ शेअर्ससारख्या कंपनीत पैसे अडकल्याने काही दिवसांपूर्वी ‘लखपती’ असणारे गुंतवणूकदार ‘कंगाल’ बनले आहेत.