शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. शेतजमीन गेल्यानंतर येणाऱ्या पिढीने काय करायचे?, वडिलोपार्जित जमीन गेली आणि पैसे आले तर ठीक; नाहीतर ‘मुळशी पॅटर्न’सारखी अवस्था झाली तर त्याला जबाबदार कोण?
Nagpur-Goa Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचा घाट सरकारकडून घातला जात आहे. याला दक्षिण महाराष्ट्रातील (South Maharashtra) शेतकरी, महायुतीतील नेते, तसेच मंत्र्यांकडूनही विरोध सुरू आहे. या महामार्गाच्या माध्यमातून धार्मिक पर्यटन स्थळे एकमेकांना जोडणे; तसेच आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न म्हणून हा महामार्ग असला तरी या शक्तिपीठाची ‘शक्ती’ खरी कोणासाठी, असा प्रश्न यातून पुढे येत आहे.