Wife Ends Life After Husband's Death : दुपारी आई घरी आल्यानंतर दरवाजा उघडत नसल्याने तिने खिडकीतून पाहिले असता आरोशीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तत्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडून तिला खाली उतरवले.
इचलकरंजी : तारदाळ (ता. हातकणंगले) येथे प्रेमविवाह केलेल्या पतीने आत्महत्या केल्यानंतर १९ वर्षीय पत्नीनेही अखेर गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली. आरोशी प्रणव पारखे (वय १९, रा. श्रीरामनगर, तारदाळ) असे मृत युवतीचे नाव आहे.