
फुलेवाडी: ऐतिहासिक रंकाळा तलावात आज सकाळी पुन्हा दोन कासवे मृत्त झाल्याचे आढळून आले. रंकाळा टॉवर समोरील राजघाटानजीक पाण्यावर तरंगताना ही कासवे आज आढळली. याच महिन्यात ७ जुलै रोजी एक मोठे कासव मृत झाल्याचे आढळले होते. तीन आठवड्यातच पुन्हा आज दोन कासवे मृत आढळली.