बाप्पाच्या आगमनादिवशीची गर्दी टाळणार ; बैठकीत मूर्तीकारांचे आश्‍वासन

Will avoid the crowd on the day of Bappa's arrival; Assurance of sculptors in the meeting
Will avoid the crowd on the day of Bappa's arrival; Assurance of sculptors in the meeting
Updated on

कोल्हापूर : भक्तांना गणेश आगमनापूर्वी दोन-चार दिवस अगोदरच मूर्ती नेण्यास सांगून आगमना दिवशीची गर्दी टाळण्यास कटिबद्ध राहू, असा विश्‍वास मूर्तिकारांनी आज पोलिस प्रशासनाला दिला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उत्सवातील गर्दी टाळण्यासाठी आयर्विन ख्रिश्‍चन मल्टिपर्पज हॉल येथे ही बैठक झाली. बैठकीस अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, तसेच शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
गणेश आगमनाच्या दिवशी सार्वजनिक व घरगुती गणेश भक्तांची होणारी गर्दी टाळून कोरोनाचा संसर्ग रोखण्याबाबतची दक्षता पोलिस प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्याच धर्तीवर पोलिस प्रशासन व मूर्तिकारांची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक काकडे म्हणाले, ""कोरोनाच्या संकटाचे धोके विचारात घेऊन घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती चतुर्थीपूर्वी भक्तांना नेण्यास सांगा. मूर्ती नेताना एक-दोनच भक्तांना येण्याबाबतच्या सूचना करा. लहान वाहनांच्या वापराबाबत भक्तांना आवर्जुन सांगा.'' 
शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे म्हणाल्या, ""गणेशमूर्ती लवकरात लवकर भक्तांनी घेऊन जाव्यात यासाठी मूर्तिकारांनी आग्रही बनावे. मोकळ्या मैदानाचा स्टॉल उभारण्यासाठी वापर करावा. भक्तांना सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व पटवून सांगावे.'' पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी कोरोनाच्या वाढत्या संकटाचा विचार करून भक्तांच्या प्रबोधनासाठी मूर्तिकारांनी पुढे येण्याचे आवाहन केले. पोलिस निरीक्षक अनिल गुजर म्हणाले की, मूर्तिकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भक्तांना सोशल डिस्टन्सिंगबाबतच्या सूचना द्याव्यात. 

जिल्हा कुंभार समाज कृती समितीचे कार्याध्यक्ष बबन वडणगेकर, मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष संभाजी माजगावकर, सचिन अनिल निगवेकर, कोल्हापूर शहर माल उत्पादक सोसायटीचे संचालक चंद्रकांत गोरंबेकर यांनी पोलिस प्रशासनाच्या आवाहनाला मूर्तिकारांची साथ राहील, असे आश्‍वासन दिले. 

या मुद्दयावर झाले एकमत... 
*मूर्ती चतुर्थीच्या अगोदर भक्तांना नेण्यास सांगणे 
*मूर्ती भक्तांना देताना गर्दी टाळणे 
*मूर्ती नेण्यासाठी एक ते दोनच भक्तांनी यावे अशा सूचना करणे 
*मूर्ती नेण्याच्या वेगवगळ्या वेळा निश्‍चित करणे 
*सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com