esakal | सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगीसाठी प्रयत्न करणार - चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांत पाटील

सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगीसाठी प्रयत्न करणार-चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: येथील रंगकर्मी आंदोलनातर्फे आज मिरजकर तिकटी येथे सांस्कृतिक कला बाजार मांडण्यात आला. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट देवून सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी मिळावी, यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही दिली. यावेळी बाबा पार्टे, जयकुमार शिंदे यांनीही कलाकारांच्या या मागणीला पाठिंबा दिला.

हेही वाचा: Kolhapur : ऐतिहासिक देखाव्यातून प्रबोधनाची वाट

मिरजकर तिकटीनंतर संभाजी नगर येथील संभाजीनगर तरुण मंडळाच्या गणपती समोर विविध कलाविष्कार सादर झाले. यावेळी झंकार सुतार, रवी सुतार, महेश सोनुले, वेदा सोनुले, सुरज नाईक, दिनेश माळी, नितीन सोनटक्के, मंजिरी दोडन्नावर,रणजित बुगले यांनी गीते सादर केली. त्यांना भार्गव कांबळे, गौतम राजहंस, अनिकेत ससाणे यांनी साथसंगत केली. श्रद्धा शुक्ल आणि सागर बगाडे यांनी गोंधळ नृत्य केले.

भर पावसात या कलाकारांनी आपली कला सादर केली. मुकुंद सुतार, सुनिल घोरपडे, प्रसाद जमदग्नी धनंजय पाटील, रोहन घोरपडे, मनोज जोशी, समीर भोरे, अजय खाडे यांनी नियोजन केले. श्रीधर जाधव, रमेश सुतार, शेखर गुळवणी यांनी ध्वनी व्यवस्था केली. दरम्यान, उद्या (रविवारी) अकरा वाजता मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आणि साडेबाराला कसबा बावडा येथील भगवा चौकात आंदोलन केले जाणार आहे.

loading image
go to top