

Kolhapur Shocker: ₹7,000 Loan Leads to ₹1.5 Lakh Extortion and Abuse Allegations
sakal
इचलकरंजी : केवळ सात हजार रुपये उसने घेतलेल्या विवाहित महिलेला अवाजवी व्याजाच्या जाळ्यात अडकवून तब्बल दीड लाख रुपये उकळल्याचा तसेच कर्जाची परतफेड न झाल्याच्या कारणावरून तिला जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास प्रवृत्त करून त्यातून आर्थिक लाभ मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.