
इचलकरंजी: मुलगाच हवा, यासाठी होणाऱ्या सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वाती अमोल ऐवळे (वय २३, रा. कोरोची) असे विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अमोल ऐवळे, सासरे हणमंत ऐवळे, सासू सुरेखा ऐवळे आणि दीर राजू ऐवळे (सर्व रा. कोरोची) या चौघांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फिर्याद सुरेश महादेव बिरलिंगे (वय ४३, रा. मेडद रोड, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी दिली आहे.