Police Constable : पोलिस कॉन्स्टेबलचा घरात घुसून धिंगाणा; महिलेची थेट पोलिस अधीक्षकांकडे तक्रार, नेमकं काय घडलं?

Police Constable : खतिफकडून कुटुंबीयांना धोका असल्याचेही त्या महिलेने तक्रार अर्जात म्हटले आहे.
Gokul Shirgaon Police Station
Gokul Shirgaon Police Stationesakal
Updated on
Summary

खतिफ हा गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात (Gokul Shirgaon Police Station) कार्यरत आहे. त्याची फेसबुकवरून संबंधित महिलेशी ओळख झाली होती.

कोल्हापूर : फेसबुकवर (Facebook) झालेल्या ओळखीतून महिलेला जबरदस्तीने मैत्रीसाठी भाग पाडणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलने (Police Constable) घरात घुसून धिंगाणा केल्याची तक्रार पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे केली आहे. अझरुद्दीन खतिफ (रा. हेर्ले, ता. हातकणंगले) असे त्या पोलिसाचे नाव आहे.

मंगळवारी दुपारी पीडित महिलेच्या घरात हा प्रकार घडला. खतिफकडून कुटुंबीयांना धोका असल्याचेही त्या महिलेने तक्रार अर्जात म्हटले आहे. खतिफ हा गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात (Gokul Shirgaon Police Station) कार्यरत आहे. त्याची फेसबुकवरून संबंधित महिलेशी ओळख झाली होती. त्यानंतर त्याने या महिलेला मैत्री ठेवण्यासाठी धमकावले.

Gokul Shirgaon Police Station
हृदयद्रावक! पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघातात सात महिन्यांची गर्भवती महिला जागीच ठार; डोक्यावरून गेले कंटेनरचे चाक

याला नकार देताच चिडून तिच्या घरात घुसून शिवीगाळ केली. महिलेसह तिच्या मुलांना, आईला जिवे मारण्याची धमकी दिल्याने तिने शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याकडे तक्रार अर्ज दिला होता. मात्र, कारवाई न झाल्याने तिने बुधवारी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

A youth was arrested after creating a ruckus, vandalising property and threatening police officers at Sahakarnagar Police Station while demanding his friend's release.
Why was Surekha Nyare killed?
Kolhapur Shahuwadi killed investigation
Fire breaks out at historic Byculla Police Station first floor administrative office short circuit suspected Mumbai
Marathi News Esakal
www.esakal.com