esakal | ह्रदयद्रावक! नव्या दुचाकीचे पासिंग होण्याआधीच काळाने घातला घाला 
sakal

बोलून बातमी शोधा

woman dead in accident kolhapur kaner

आज मोपेड आणण्यास आणि पासिंगसाठी त्या गेल्या होत्या.

ह्रदयद्रावक! नव्या दुचाकीचे पासिंग होण्याआधीच काळाने घातला घाला 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - आयसोलेशन रिंगरोडवर काल दुपारी झालेल्या अपघातात दिव्यांग महिला गंभीर जखमी झाली. सेवा रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. मीरा गोरख नवले (वय ३५, कणेरी, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. आणखी एक जण जखमी झाला. नोंद करण्याचे काम राजारामपुरी पोलिसांत सुरू होते.

नवले यांनी मोपेड खरेदी केली. काही बदल करण्यास मोपेड दिली होती. आज मोपेड आणण्यास आणि पासिंगसाठी त्या गेल्या होत्या. मोपेड घेऊन दुपारी आयसोलेशनमार्गे घरी जात असताना मोपेडचा अपघात झाला. त्यात नवले गंभीर जखमी झाल्या. अग्निशामक दलाने नवले यांना सेवा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

नवले यांचे पती बेकरीत नोकरी करतात तर नवले क्‍लिनिकमध्ये काम करत होत्या. त्यांना दोन मुली आहेत. वर्षापूर्वीच त्यांनी घर बांधले होते. आठ दिवसांपूर्वीच नवले यांनी मोपेड खरेदी केली होती. पासिंग करण्याआधीच ही दुर्घटना घडली.

हे पण वाचा - धगधगती स्मशानभूमी ; चोवीस तासात तब्बल शंभर अंत्यसंस्कार

मोपेड पलटी होऊन अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. संदीप शिवाजी चोरडे (वय ३४) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तपास व्ही. आर. भिवटे व तळेकर करीत आहेत.

हे पण वाचा -  Good News : आता ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर मिळणार कर्ज 

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top