
Panchganga River Ichalkaranji : इचलकरंजीतील पंचगंगा नदीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाचविले. घरगुती वादातून संबंधित पन्नास वर्षीय महिला पंचगंगा घाटावरुन थेट पूराच्या पाण्यात जात होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर तातडीने तिला रोखण्यात आले.