ह्रदयद्रावक: सात महिन्याच्या तान्हुल्यासह मातेची आत्महत्त्या

women suicide with child kolhapur kagal
women suicide with child kolhapur kagal

कागल (कोल्हापूर) : सात महिन्याच्या तान्हुल्यासह साडीने गळफास लावून घेवून एका परप्रांतिय महिलेने आत्महत्त्या केली. बुधवारी सकाळी सव्वासात वाजता ही घटना उघडकीस आली. कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीच्या मेट्रो टेक्स्टाईल पार्कमधील कामगार चाळीत ही घटना घडली आहे. संबरी लक्ष्मीधर मरंडी ( वय २४, मूळ ओडिसा) व मुलगा भगवान (वय ७ महिने ) अशी त्यांची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. 


ओडिसा येथील लक्ष्मीधर भगवान मरंडी हे मेट्रो टेक्स्टाईल पार्कमधील सुत गिरणीत कामाला आहेत. गेल्या दिड दोन महिन्यापासून ते मेट्रो स्पिनिंग मिलमध्ये काम करतात. या मिलच्या शेजारीच कामगारांना राहण्यासाठी खोल्या बांधण्यात आल्या आहेत. यातील एका खोलीत लक्ष्मीधर आपली पत्नी संबारी आणि मुलगा भगवान यांच्यासह राहत आहेत. रात्री अकरा वाजता रात्रपाळी असल्याने ते सुतगिरणीत कामावर गेले होते.

सकाळी सव्वासात वाजता कामावरून घरी परत आल्यानंतर घराचा दरवाजाचा आतून बंद असल्याने तो उघडण्यासाठी पत्नीला हाक मारली. मात्र आतून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेजारील कामगारांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला. घरात गेल्यानंतर त्याला पत्नीने मुलासह साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती कागल आणि गोकुळशिरगांव पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहाय्यक फौजदार अशोक पाटील, राम डावाळे, मनिषा ढेकळे, महादेव बिरांजे, महेश पाटील आणि मोहन माटुंगे यांनी घटनेचा पंचनामा केला. पंचनामा करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान करवीरचे पोलिस उपअधिक्षक आर. आर. पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. 

संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com