
मलकापूर : एसटी महामंडळाच्या ५० प्रवासी आसन क्षमतेच्या बस आजवर पुरुष चालक चालवत आहेत. मात्र, एसटी महामंडळाने आता एसटी चालविण्यासाठी महिलांना संधी दिली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या कोल्हापुरातील पहिल्या प्रशिक्षित चालक सरोज महिपती हांडे (रा. सुपात्रे, ता. शाहूवाडी) यांनी मलकापूर-कोल्हापूर मार्गावर पहिल्यांदा एसटी चालवत कोल्हापूर एसटी सेवेत महिला एसटीचालक म्हणून कर्तव्य बजावले. त्यांच्या धडाडीबद्दल प्रवाशांसोबतच एसटी अधिकाऱ्यांनीही त्यांचे कौतुक केले.