Kolhapur Belgaum Scam : ‘झुकती है दुनिया.. झुकानेवाला चाहिये’, या प्रसिध्द डायलॉगनुसार आणखी एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार बेळगाव शहरात उघडकीस आला आहे. घरबसल्या काम देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील भामट्याने बेळगाव जिल्ह्यातील हजारो महिलांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचे धक्कादायक प्रकरण उघडीस आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलांनी पहिल्यांदा पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. आयुक्तांच्या सूचनेनुसार शहापूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.