
कोल्हापूर : विद्यार्थांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषदेच्या सर्व माध्यमिकसह प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्ह्यातील १०३८ प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित कॅमेरे काही दिवसांत बसविले जाणार आहेत.