esakal | बेळगावातील कामगारही स्पेशल रेल्वेच्या प्रतिक्षेत...
sakal

बोलून बातमी शोधा

Workers in Belgaum waiting for the special train

मंगळवारपासून धावलेल्या या विशेष रेल्वेसाठी ऑनलाईन बुकींग करण्यात आले होते. मात्र, बेळगावातून रेल्वे धावणार नसल्याची माहिती मिळताच अनेकांच्या पदरी निराशाच पडली.

बेळगावातील कामगारही स्पेशल रेल्वेच्या प्रतिक्षेत...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बेळगाव - बेंगळूर-दिल्ली एक्‍सप्रेस मंगळवारपासून सुरु झाली असून ही रेल्वे नियमित ऐवजी पर्यायी मार्गाने धावणार आहे. त्यामुळे बेळगावला हुलकावणी मिळाली आहे. प्रवाशांच्या पदरी निराशा झाली आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी नवीन रेल्वे सुरु करण्याबाबत दिलेल्या संकेतानुसार देशातील विविध भागात रेल्वे मंगळवारपासून (ता.12) धावण्यास सुरुवात झाली. कर्नाटकात एकमेव रेल्वे सुरु झाल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली असून बंगळूर-दिल्ली-बंगळूर असा मार्ग रेल्वेचा असणार आहे. नियमितपणे या रेल्वेचा मार्ग बंगळूर, धारवाड, बेळगाव, मिरज, पुणे, ते दिल्ली असा असायचा. लॉकडाऊननंतर सुरु झालेल्या स्पेशल रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला आहे. सदर रेल्वे बेळगाववरून जाणार नसून ती बंगळूर, अनंतपूर, गुंदकल, सिकंदराबाद, नागपूर, भोपाळ, झांसीमार्गे दिल्लीला जाणार आहे. त्यामुळे पुढील टप्यात बेळगावहून रेल्वे धावण्याची शक्‍यता आहे.

वाचा - चार दिवसात बेळगाव शहरात आले १२० जण...

मंगळवारपासून धावलेल्या या विशेष रेल्वेसाठी ऑनलाईन बुकींग करण्यात आले होते. मात्र, बेळगावातून रेल्वे धावणार नसल्याची माहिती मिळताच अनेकांच्या पदरी निराशाच पडली. लॉकडाऊनमुळे बेळगावातही अनेक परराज्यातील कामगार अडकले आहेत. सध्या इतर प्रवासी वाहतूक बंदच आहे. बंगळूर दिल्ली रेल्वे सुरु होणार असल्याने बेळगावातून अन्य ठिकाणी जाणारे अनेक प्रवासी होते. मात्र, अन्य मार्गाने रेल्वे सुरु होणार असल्याची माहिती मिळाल्याने नाराजी दिसून आली. बेळगावातूनही रेल्वे सुरु करावी अशी मागणी होत आहे.


देशभरात आजपासून विशेष रेल्वे सुरु झाल्या. कर्नाटक राज्यातून बंगळूर ते दिल्ली अशी एकच रेल्वे धावणार आहे. बंगळूर, अनंतपूर, सिकंदराबाद, नागपूर, भोपाळ ते दिल्ली असा त्याचा मार्ग आहे. मंत्रालयाच्या सूचनेनुसार अन्य रेल्वे सुरु होतील.
प्राणेश, जनसंपर्क अधिकारी, नैर्ऋत्य रेल्वे

loading image
go to top