
-संदीप जगताप
इचलकरंजी : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे पाच हजार रुपये आले आहेत. ते तुमच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी खात्याची माहिती व ओटीपी आवश्यक आहे, असे बनावट फोन कॉल सध्या येथील महिलांना येत आहेत. हे भामटे महिलांना अंगणवाडी, पुणे कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महिला बाल विकास कार्यालयाची डोकेदुखी वाढली आहे. सध्या सॉफ्ट टार्गेट म्हणून सायबर गुन्हेगारांकडून प्रसूती झालेल्या महिलांना लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.