
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला वर्ष झाले. जिल्ह्यातील दोन खासदारांना जनतेने दिल्लीला पाठवले. मात्र, वर्षभरात एकही मोठा प्रकल्प जिल्ह्यात आला नाही. केंद्राच्या फारशा योजनाही जिल्ह्यात सुरू नाहीत. गेल्या पंचवार्षिकमध्ये भूमिपूजन झालेले प्रकल्पही प्रगतीपथावर नाहीत. एकूणच कोल्हापूरच्या विकासाची झोळी रिकामीच आहे.