esakal | यंदा उसाची कांडी करणार हाडाची काडं
sakal

बोलून बातमी शोधा

 This year, sugarcane will be used as a bone stick

जिल्ह्यात ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये साखर कारखाने सुरू होत आहेत. परजिल्ह्यातील किंवा परराज्यातील 60 वर्षांवरील मजूर, इतर व्याधी असणाऱ्या मजुरांना परवानगी दिली जाणार नाही. मुलांना कामाच्या ठिकाणी घेऊन जाता येणार नाही. ऊसतोडीसाठी मजुरांऐवजी यांत्रिकीकरणावर भर तसेच, इतर मजुरांनी आपआपल्या जिल्ह्यातच कोरोनाची तपासणी करूनच जिल्ह्यात ऊस तोडणी व वाहतुकीसाठी परवानगी दिली जाईल, अशा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.

यंदा उसाची कांडी करणार हाडाची काडं

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये साखर कारखाने सुरू होत आहेत. परजिल्ह्यातील किंवा परराज्यातील 60 वर्षांवरील मजूर, इतर व्याधी असणाऱ्या मजुरांना परवानगी दिली जाणार नाही. मुलांना कामाच्या ठिकाणी घेऊन जाता येणार नाही. ऊसतोडीसाठी मजुरांऐवजी यांत्रिकीकरणावर भर तसेच, इतर मजुरांनी आपआपल्या जिल्ह्यातच कोरोनाची तपासणी करूनच जिल्ह्यात ऊस तोडणी व वाहतुकीसाठी परवानगी दिली जाईल, अशा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी देसाई यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्येसाखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु होत आहे. परजिल्ह्यातील किंवा परराज्यातील ऊस तोड मजूरी कोल्हापूर जिल्ह्यात येत असतात. यंदाच्या गळीत हंगामात हे कामगार बोलावत असताना कारखान्यांना काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. जिल्हयामध्ये कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात झालेला आहे. तसेच येत्या काळामध्ये त्यामध्ये वाढ होणेची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे साखर कारखान्यांच्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी मजूर किंवा इतर मनुष्यबळ मोठया प्रमाणावर एकत्रित येण्यामुळे त्यांच्यामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे या कामगारांवर काही निर्बंध घातले आहेत. 

गळीत हंगामासाठी नियम व अटी 
- 60 वर्षांवरील मजुरांना मनाई 
- व्याधीग्रस्तांना मनाई 
- प्रमाणित मजूरच ऊसतोडणीसाठी मुभा 
- मुलांसाठी कारखान्यांवर स्वतंत्र व्यवस्था 
- कामगारांची त्या जिल्ह्यातच कोरोना तपासणी 
- ऊस तोडणीच्या ठिकाणी रोज आरोग्य तपासणी 
- ऊसतोडीसाठी यांत्रिकीकरणावर भर 
- प्रत्येक साखर कारखान्याकडे विलगीकरण केंद्र 
- कारखाना कार्यस्थळावर वैद्यकीय सुविधा बंधनकारक 
- मजूरांना आपआपल्या जिल्ह्यात कोरोना तपासणी करून घ्यावी 

क्वारंटाईन बंधनकारक

बाहेरून येणाऱ्या कामगारांना कारखान्यांवर 7 दिवसांचा क्वारंटाईन बंधनकारक करावा. यासाठी अलगीकरणाची व्यवस्था प्रत्येक साखर कारखान्यांने करावी. 

संपादन ः रंगराव हिर्डेकर

loading image
go to top