Kolhapur Accident : येळवडेत भर दुपारी गवताच्या ट्रॅक्टरला आग; मुख्य रस्त्यावर दोन तास थरार
Tractor Carrying Grass Catches Fire : मुख्य वीज वाहिनीला भरलेल्या गवताचा स्पर्श झाल्याने ट्रॅक्टरच्या ट्रेलरमधील गवताला अचानक आग लागली. धूर दिसताच नागरिकांनी चालकाला थांबवून प्रसंगावधान राखत आग विझवण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले.
राशिवडे बुद्रुक : येळवडे (ता. राधानगरी) येथे गवत घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला आग लागली. भर दुपारी मध्यवर्ती मुख्य रस्त्यावर दोन तास अग्नीचा थरार सुरू होता. सुदैवाने आग आटोक्यात आणण्यात यश आले.