Kolhapur Crimeesakal
कोल्हापूर
Kolhapur Crime : एकतर्फी प्रेमाच्या त्रासामुळे कीटकनाशक प्यायलेल्या तरुणीचा मृत्यू; पोलिसांच्या जबाबात गायत्रीनं काय सांगितलं?
Kolhapur Crime : वाघवे येथे राहणाऱ्या आदित्य पाटील याचे तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. त्यातून तो गायत्रीचा पाठलाग करून त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून तरुणीने ३० एप्रिलला कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
पन्हाळा : एकतर्फी प्रेमाच्या (One Sided love) त्रासाने कंटाळून कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणीचा आज मृत्यू झाला. गायत्री ऊर्फ सानिका माणिक पोवार (वय १८, रा. वाघवे) असे तरुणीचे नाव आहे.