
Kolhapur-Ratnagiri National Highway : कोल्हापूर -रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील येळाणे (ता. शाहूवाडी) येथे मोटारसायकल व ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकलचालक साहिल मेहबूब आंबी (वय २६, मूळ रा. उद्यमनगर, सध्या रा. कंदलगाव कमानीजवळ, ता. करवीर) हा ट्रकखाली सापडून जागीच ठार झाला. आज दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला.