Shiroli : पत्नीला व्हिडिओ कॉल करत शिरोलीत तरुणाने संपवले जीवन; छताच्या पंख्याला ओढणीने घेतला गळफास
Kolhapur News : माने हा दारूच्या आहारी असल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचे. पत्नी माहेरी गेली असल्याचे समजते. अभिजितने पत्नीला व्हिडिओ कॉल केला. ‘तू ताबडतोब निघून ये, नाहीतर मी गळफास घेऊन आत्महत्या करणार,’ असे तो पत्नीला सांगत होता.
The tragic scene in Shiroli where a young man took his own life after a video call with his wife.Sakal
नागाव : छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन पुलाची शिरोली येथे तरुणाने आत्महत्या केली. अभिजित दत्तात्रय माने (वय ३८, रा. एकता कॉलनी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. दुपारी साडेतीन वाजता ही घटना उघडकीस आली.