

Lover caught talking to girlfriend beaten in Kolhapur
esakal
Social Media Viral Crime Video : कसबा बावड्यातील एका मुलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांतून तरुणाला बेदम मारहाण करून विवस्त्र फिरविण्यात आल्याची घटना आज दुपारी घडली. विळ्याने त्याच्या पोटावरही वार केल्याने तो जखमी झाला. बावड्यातील पाणंद रस्त्यावर प्रेमीयुगुल सापडल्याने संतापातून मुलीच्या घरच्यांनी ही मारहाण केल्याचे समोर आले. दिवसभर याचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत होता.