

Crime news from Ichalkaranji
esakal
Ichalkaranji latest crime update : वडिलांना फोनवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून तीन मित्रांनी आपल्या मित्राचा निर्घृण खून केला. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (ता. १७) मध्यरात्री दीडच्या सुमारास येथील कृष्णानगरसमोरील महालक्ष्मीनगरातील निर्जनस्थळी घडला. शाबाज शब्बीर शेख (वय २३, रा. शामरावनगर, सांगली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात आसिफ जिल्लाणी यलकुंद्री, सोहेल सनदी (दोघे रा. शामरावनगर, सांगली) व आखिल मुजावर (रा. इचलकरंजी) या तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.