Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद
Brutal Knife Attack in Kurundwad : मारेकर्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसाची तीन पथके नियुक्त करण्यात आली आहेत.दरम्यान खून झालेल्या युवकाची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असून त्यादृष्टीनं तपास यंत्रणाकडून विविध शक्यतांची पडताळणी करीत आहेत.
Tension in Kurundwad After Knife Attack on Youth Following EnmitySakal
कुरुंदवाड : धारदार शस्त्राने सपासप वार करीत येथील अक्षय दीपक चव्हाण (वय २६)या युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. रविवारी रात्री उशीरा येथील मुख्य चौकातच ही घडली असून याबाबतची नोंद कुरुंदवाड पोलिसात झाली आहे.