जिल्हा परिषद सदस्यांना टॅब मि्ळाले आता होणार ऑनलाईन सभा

 Zilla Parishad members get tabs Now online meetings will be held
Zilla Parishad members get tabs Now online meetings will be held
Updated on

कोल्हापूर : राज्यातील सर्व नागरिकांना अर्सेनिक अल्बम-30 आणि संशमनी वटी औषधांचे वाटप करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून त्याचा प्रारंभ शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद सदस्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते. 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महिला व बाल विकास समिती सभापती पद्माराणी पाटील, समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, शिक्षण सभापती प्रविण यादव, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील उपस्थित होते. 
युनानी काढा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास प्रभावी ठरला आहे. त्यामुळे मालेगाव, भिवंडी, मुंब्रा, कुर्ला येथील कोरोना अटोक्‍यात आला. लवकरच अध्यादेश काढून युनानी काढ्याचा समावेश कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी असणाऱ्या औषधांमध्ये करणार आहे. 
बैतुलमाल कमिटीने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यावर अंत्यसस्कार केले आहेत. त्यांच्यासह कोरोना मृतदेहांवर शहरी क्षेत्रात अंत्यसंस्कार करणाऱ्यांसाठी 50 लाखाचे विमा कवच मिळावे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. तसेच ग्रामीण भागासाठी 50 लाखाचे विमा कवच दिले जाईल, अशी घोषणा मंत्री मुश्रीफ यांनी केली. तसेच ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविकांना सप्टेंबरपर्यंत 50 लाखाचे विमा कवच लागू करण्यात आले आहे. असे सांगितले. 
तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीप्रमाणे जिल्हा परिषदेची बैठकही व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे घेता यावी. या उद्देशाने आज प्रतिनिधीक स्वरूपात सदस्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. 

पालकमंत्र्यांचे काम उत्कृष्ट 
कोरोनाच्या तपासण्या वाढल्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही संख्या आणखी वाढणार आहे. राज्यात अनुभव नसतानाही मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत. जिल्ह्यात पालकमंत्री सतेज पाटील यांचेही अतिशय उत्कृष्ट काम सुरु आहे. ही वेळ टीका-टिप्पणी, आंदोलन करण्याची नसून सर्वांनी एकत्र येऊन आलेल्या संकटावर मात करण्याची असल्याचे श्री मुश्रीफ यांनी सांगितले. 

सदस्यांनी गटात जाऊन अडचणी जाणून घ्याव्यात 
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ऑनलाईन सभा घेण्यासाठी टॅबचा वापर आता होणार आहे. या नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणारी कोल्हापूर जिल्हा परिषद पहिली असेल. जिल्हा परिषदेमार्फत अनेक उपक्रम राबवले जात आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र किती महत्वाची आहेत हे आता लक्षात आले असेल. प्रत्येक सदस्यांनी आपल्या गटात जावून नागरिकांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. त्यांना सुविधा द्याव्यात.

संपादन ः .यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com