
esakal
Highlight Summary Points
‘सरकार’ आणि ‘९६ कुळी’ मंडळी आता ‘कुणबी’ बनले:
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘सरकार’ व ‘९६ कुळी मराठा’ सांगणारे अनेक जण आता ‘कुणबी’ दाखले काढत आहेत, कारण ‘कुणबी’ ही जात ओबीसी प्रवर्गात येते आणि या प्रवर्गाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळतो.
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ‘कुणबी’ दाखले:
ओबीसी महिलांसाठी आरक्षित गटांमध्ये संधी साधण्यासाठी काही इच्छुकांनी स्वतःसह पत्नींचेही ‘कुणबी’ दाखले मिळवले आहेत, तर अनेकांनी आरक्षण निश्चितीनंतर अर्ज सादर करण्याची तयारी केली आहे.
पैसा ठरवणार उमेदवारीचा निकष:
आर्थिक ताकद असलेलेच उमेदवारीसाठी दावेदार ठरणार, असा कल दिसतो आहे. ‘खरे’ ओबीसी उमेदवार मागे पडतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
Maharashtra Politics Zilla Parishad News : सार्वजनिक जीवनात, कुटुंबातील सदस्यांचे लग्न ठरवताना आम्ही ‘सरकार’, ‘९६ कुळी’ सांगणारे अनेक जण आता जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी ‘कुणबी’ होणार आहेत. गट, गणांवर आरक्षण काहीही पडू देत पण लढायचेच, असे ठरवलेल्या काहींनी यापूर्वीच ‘कुणबी’चे दाखले काढले आहेत, तर आरक्षण निश्चितीनंतर ज्याठिकाणी ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झालेल्या ठिकाणी संधी हुकलेल्यांनी स्वतःच्या सौभाग्यवतींचे दाखल काढण्यास सुरुवात केली आहे.