esakal | कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटीलसह सभापती पदासाठी नावे निश्चित
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर जिल्हा परिषद  सभापती पदासाठी नावे निश्चित

कोल्हापूर जिल्हा परिषद सभापती पदासाठी नावे निश्चित

sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्हापूर: जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राहुल पाटील (z p president rahul patil) तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे जयवंतराव शिंपी (vice president jayawantrao shimpi) यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले. पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि यांनी केली. शासकीय विश्रामगृह येथे राहुल पाटील आणि जयवंतराव शिंपी यांच्या नावाची घोषणा पत्रकार परिषदेत केली.

यावेळी सभापती पदासाठी चार नावे निश्चित करण्यात आली आहेत. यात खासदार प्रा. संजय मंडलिक गटाच्या शिवानी भोसले, आमदार प्रकाश आबिटकर गटाच्या वंदना जाधव, माजी आमदार चंद्रदीप नरके गटाच्या कोमल मिसाळ व अपक्ष रसिका अमर पाटील यांची निवड निश्चित करण्यात आली आहे. त्यांना कोणत्या समितीचे सभापती पद द्यायचे याचा निर्णय सायंकाळी होणार आहे. उद्या निवड होणाऱ्या सभापतींची नावे सायंकाळी पत्रकार परिषदेत जाहीर केली जाणार आहेत.

हेही वाचा- Kolhapur ZP Election 2021:अध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून राहुल पाटलांचं नाव निश्चित

दरम्यान, भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडणार आहे. पदाधिकारी निवडीची औपचारिकता बाकी राहिली आहे.

loading image