
जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता
esakal
ZP Election Postponement News : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीतील भूमिका ही पुढील काही महिन्यांत होणाऱ्या गोकुळ दूध संघ आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवर थेट परिणाम करणार आहे. आज घेतलेली राजकीय बाजू उद्याच्या सहकारी रणांगणात ओझं ठरू शकते. त्यामुळे नेत्यांनी सध्या मौन धारण केलं आहे. काहींनी आपापल्या गटांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर होईपर्यंत कोणतीही भूमिका जाहीर करू नका, अशा स्पष्ट सूचना केल्या आहेत. मतदार याद्यांतील गोंधळामुळे निवडणुका लांबल्या, तर मोठ्या राजकीय अडचणींचा सामना करावा लागेल, या भीतीने इच्छुकांच्या पोटात गोळा आला आहे.