सांगलीत गृहिणीने उभारले कोरोना रुग्णालय; वाचा सविस्तर

विजय लोहार
Saturday, 29 August 2020

१२० वर्षापूर्वीच्या झोपडीतल्या पाळण्यात बालगणेशाची प्रतिष्ठापणा केली आहे

नेर्ले : गणेशोत्सव निमित्ताने नेर्लेतील गृहिणी कांचन संदेश पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रबोधनात्मक गौरी गणपती सजावटीच्या माध्यमातून कोरोनाचे रुग्णालयच उभे केले आहे. १२० वर्षापूर्वीच्या झोपडीतल्या पाळण्यात बालगणेशाची प्रतिष्ठापणा केली आहे. बालगणेश आणि त्याची आजी यांचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवरचा संवाद साधताना दिसतो आहे. यामध्ये बालगणेशाने बाहेर जाऊ का? असे विचारल्यावर बाहेर फिरू नको कोरोना आहे असे आजीने सुनावले आहे.

हेही वाचा - तासाभरातच बिबट्याने घेतला सुटकेचा श्वास ; कुठे घडली घटना ? 

मग मावशी आणि काकी कशा बाहेर जातात? या बालगणेशाच्या प्रश्नावर, 'अरे मावशी पोलीस आहे तर काकी डॉक्टर आहे' त्यामुळे त्यांना लोकांची काळजी घ्यावी लागते.अशा संवादातून कांचन पाटील यांनी हा प्रबोधनाचा  उपक्रम राबवला आहे. त्यांनी देखाव्यात झऱ्याचे पाणी, बालगणेशाला पाळण्यात बसवून पाळणा हलवणारी आजी, रस्ता दाखवून त्यावर वाहने अडवुन कोरोना संदर्भात माहिती देणीरे महिला पोलीस कर्मचारी, तर शेतात राबणाऱ्या बैलजोडी बरोबरच तंत्रज्ञानाचा वापर करीत शेती करणारे ट्रॅक्टर दाखवले आहे. कोरोनाच्या प्रबोधनासाठी त्यांनी कंपाउंडर, डॉक्टर पेशातील गौरी,  कोरोना विषयी माहिती विचारणारी महिला असा देखावा उभारला आहे. 

हेही वाचा - सावंतवाडी घंटानाद आंदोलन : दार उघड उद्धवा दार उघड…! दार उघड विठ्ठला दार उघड…!

कांचन यांना या देखाव्या पती संदेश पाटील, सासू मीनाक्षी  आणि  सासरे शंकर दत्तू पाटील यांचे सहकार्य लाभले आहे. आई वैशाली व वडील भूपाल महादेव कणसे यांनी प्रेरणा दिली असल्याचे त्यांनी सांगितले. वाळवा पंचायत समितीचे सभापती सचिन हुलवान, ग्रामविकास अधिकारी एम. डी. चव्हाण, शुभम पाटील, डॉ. सागर शिंदे, प्रताप पाटील यांनी हा देखाना पाहण्यासाठी भेट दिली. कांचन पाटील या मुळच्या किल्ले मछिंद्रगडच्या रहिवासी आहेत. त्यांनी शेती करण्याची आवड आहे. त्या ट्रॅक्टरही चालवितात. साप पकडणे, बुलेट गाडी चालवणे हे त्यांचे छंद आहेत.

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapuri house wife decorate a corona hospital during ganesh festival scene at her home