कोपर्डीतील आरोपींचे वकीलपत्र घेणारा वकीलच निघाला बनावट

Lawyer
Lawyer

नगर - कोपर्डी अत्याचार व खूनखटल्यातील आरोपींचे वकीलपत्र जिल्हा न्यायालयात सादर करणारा वकीलच तोतया निघाला. वकिलीची सनद बनावट निघाल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाने आज कर्जत येथील तोतया वकील मंगलेश भालचंद्र बापट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.

याबाबतची माहिती अशी की, एका आरोपीचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी बापट यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर विरोधी पक्षाने बापट यांच्या वकिलीवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. बापट वकील नसतानाही, त्यांनी वकीलपत्र घेतल्याची तक्रार केली. त्यानुसार न्यायालयाने 24 ऑक्‍टोबर 2018 रोजी बापट यांच्या वकिलीची सनद व त्यासाठी दाखल केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीचा आदेश पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना दिला.

शर्मा यांच्या सूचनेनुसार कर्जतचे पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण व तपासी अधिकारी एस. पी. माने यांनी चौकशी करून न्यायालयात अहवाल सादर केला. बापट यांची वकिलीची सनद व सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे अहवालात निष्पन्न झाले. लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी बापट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने कर्जत पोलिस निरीक्षकांना दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com