बेकायदा कत्तलखानाप्रकरणी आणखी दहा जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

कोपरगाव (जि. नगर) - शहरातील बेकायदा कत्तलखानाप्रकरणी पसार झालेल्या आणखी दहा आरोपींना पोलिसांनी अटक केली.

कोपरगाव (जि. नगर) - शहरातील बेकायदा कत्तलखानाप्रकरणी पसार झालेल्या आणखी दहा आरोपींना पोलिसांनी अटक केली.

न्यायालयाने त्यांना 29 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक डॉ. सागर पाटील यांनी दिली. आतापर्यंत पोलिसांनी या गुन्ह्यात 39 जणांना अटक केली आहे. दरम्यान, जनावरे ठेवण्यासाठी मदत करणारे बाजार समितीचे अधिकारी व संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी उद्या (गुरुवारी) बाजार समितीसमोर "ढोल बजाव' आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी दिला आहे.

Web Title: kopargaon nagar news 10 arreste in illegal slaughter house case