कोपरगाव-शिर्डीला पाणी जाऊ देणार नाहीच! 

Kopargaon-Shirdi won't let go of water!
Kopargaon-Shirdi won't let go of water!

अकोले  : "शिर्डी संस्थान, नगरपंचायत, कोपरगाव नगरपालिका, कोपरगावातील दोन्ही सहकारी साखर कारखाने यांत धरणग्रस्त व कालवेग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी द्यावी, अन्यथा शिर्डी-कोपरगावला "निळवंडे'तून पाणी जाऊ देणार नाही,' असा इशारा ज्येष्ठ नेते व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक मीनानाथ पांडे यांनी आज दिला. 

हेही वाचा इतके शेतकरी कर्जमाफीच्या यादीत 

पांडे यांनी याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की निळवंडे धरणाच्या दोन्ही बाजूंच्या कालव्यांचे काम अपूर्ण आहे. सध्या अकोले तालुक्‍यातील शेतजमिनीतून कालव्यांची खोदाई सुरू आहे. यातील प्रवरेवरील म्हाळादेवी येथील जलसेतूचे काम धीम्या गतीने सुरू आहे. तसेच, दोन्ही बाजूंच्या कालव्यांवर अनेक ठिकाणी ओढ्या-नाल्यांवर व रस्त्यांवर पूल केल्याशिवाय लाभक्षेत्रात पाणी पोचणार नाही. कामात मातीच्या भरावात जाणारे क्षेत्र वाचवून शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान करावे.

मागील सरकारने कालव्यांच्या कामात नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे; मात्र त्याची कार्यवाही अद्याप झाली नाही. कालव्यांची व ओढ्या-नाल्यांवरील पूल, रस्त्यांची कामे पूर्वीच्या निविदेतून वगळून अकोले तालुक्‍यातील बेरोजगार मजूर संस्था व नोदणीकृत अभियंते यांना तुकडे करून देण्यात यावीत. धरणग्रस्त व कालवेग्रस्त शेतकऱ्यांना लाभक्षेत्रात शासकीय जमीन व भूखंड देण्यात यावेत. 

आजपर्यंत संगमनेर व अकोले तालुके वगळता राहाता व कोपरगाव तालुक्‍यांत शासकीय अथवा खासगी जमीन अधिग्रहित केलेली नाही. शिर्डी व कोपरगाव ही शहरे निळवंडे कालव्यांच्या लाभक्षेत्रात येत नाहीत. त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दारणा व गोदावरी नदीवर स्वतंत्र धरण बांधावे किंवा निळवंडे कालव्याच्या शेवटी साठवण तलाव करून तेथून पाणी न्यावे. धरणग्रस्त व कालवेग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिर्डी संस्थान, नगरपंचायत, कोपरगाव नगरपालिका, कोपरगावातील दोन्ही सहकारी साखर कारखाने, तेथील दूध संघ, बाजार समिती व अन्य संस्थांमध्ये नोकरी द्यावी, नंतरच पाणी नेण्याचा विचार करावा. हे होईपर्यंत अकोले तालुक्‍यातून शिर्डी व कोपरगावची पाइपलाइन जाऊ देणार नाही, असा इशारा पांडे यांनी दिला आहे. या संदर्भात शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ जलसंपदामंत्री, तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com