हजारो विद्यार्थ्यांनी दिला मदतीचा हात

राजेंद्र वाघ
मंगळवार, 27 मार्च 2018

कोरेगाव - चंचळी (ता. कोरेगाव) गावातील एका गरीब शेतकरी कुटुंबातील काजल दिलीप कदम हिच्या भावाचा व वडिलांचा शेतात पिकाला पाणी द्यायला जाताना  अपघात झाला. या अपघातात भावाचा मृत्यू झाला तर वडिलांना अपंगत्व आले. अशा परिस्थितीत वडिलांच्या दवाखान्याचा खर्च, घराची जबाबदारी अंगावर पडली. परंतु, काजलला डी. पी. भोसले महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी मदत केली. त्यामुळे डी. पी. भोसले यांच्या दातृत्वाचा वारसा महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींही जपला असल्याची भावना व्यक्त होत आहे.  

काजल व तिच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा विभाग तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मिळून एक लाख एकवीस हजार रुपयांचा मदतनिधी जमा केला. महाविद्यालयातील एका कार्यक्रमात प्रा. श्रीधर साळुंखे व प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत यांच्या हस्ते हा मदतनिधी काजलकडे सुपूर्त करण्यात आला. 

मदतनिधीच्या संकलनामध्ये महाविद्यालयाचे क्रीडा विभाग व ‘एनसीसी’चे प्रमुख लेफ्टनंट प्रा. बाळकृष्ण भोसले, प्रा. डी. बी. पवार, प्रा. सचिन निकम, विद्यार्थी रोहित चव्हाण, सूरज भिलारे, सैन्य दलातील पंकज जगदाळे, पोलिस दलातील अश्विनी तावरे आदींचे सहकार्य लाभले.

Web Title: koregao students D P bhosle collage accident