कोयना धरणात मागील वर्षापेक्षा 19.11 टिएमसीने जास्त पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

कऱ्हाड : कोयना धरण परिसरात पडणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मागील वर्षापेक्षा यंदा 19.11 टिएमसी पाणी साठा ज्यादा आहे. त्यामुळे यंदा पाऊस जास्त असल्याने धरणातील पाणी साठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरणाचा पाणी साठा 57.93 टिएमसी झाला आहे.

मागील वर्षी याच दिवशीचा पाणी साठा 38.78 टिएमसी होता. चोवीस तासात कोयना धरण परिसरात 195 मिलीमीटर पाऊस झाला.  आजअखेर कोयना धरण परिसरात 2175 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला आजचा पाऊस 179 मिलीमीटर तर आज अखेर 2023 मिलीमीटरचा आणि  महाबळेश्वरला 156 मिलीमीटरचा तर आज अखेर 1842 मिली मीटर इतक्या पावसाची नोंद झाली  आहे. धरणात सुमारे 51 हजार 249 क्युसेक पाण्याची आवक होते आहे.

Web Title: koyana dam level have increase 19.11 tmc then last year