कोयना धरण टप्पा चारची वीजनिर्मिती बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 मे 2017

कोयना पाणीसाठ्यामधून 50 टीएमसी पाणी हे सिंचन,बिगर सिंचन पिण्याच्या पाण्यासहित पूर्वेकडे ताकारी, टेंभू योजनासाठी वापरण्यात येत असते. आजअखेर पूर्वेकडील झालेला पाणीवापर 26.87 टीएमसी एवढा असून धरणातील शिल्लक उपयुक्त पाणीसाठा 22.02 टीएमसी इतका आहे.

सातारा - कोयना धरणातील पाणी कृष्णा पाणी तंटा लवादाप्रमाणे पश्चिमेकडे वीज निर्मितीसाठी 1 जून ते 31 मे या कालावधीत 67.50 टीएमसी एवढेच पाणी वळविण्याचे बंधन असल्याने एप्रिलअखेर महाजनको यांनी 67.25 टीएमसी पाणी वापरले आहे. उर्वरित 0.25 टीएमसी पाणी मे मध्ये वापरण्याच्या दृष्टीने महाजनको अलोरे यांनी नियोजन केले आहे. त्याप्रमाणे टप्पा 4 ची वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे, अशी माहिती सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिली आहे.

कोयना पाणीसाठ्यामधून 50 टीएमसी पाणी हे सिंचन,बिगर सिंचन पिण्याच्या पाण्यासहित पूर्वेकडे ताकारी, टेंभू योजनासाठी वापरण्यात येत असते. आजअखेर पूर्वेकडील झालेला पाणीवापर 26.87 टीएमसी एवढा असून धरणातील शिल्लक उपयुक्त पाणीसाठा 22.02 टीएमसी इतका आहे, मे मधील पाण्यची गरज सिंचन, बाष्पीभवन व वीजनिर्मिती धरुन 5.87 टीएमसी इतकीच असून मे अखेर 10.925 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहणार आहे.

त्यामुळे यावर्षीचा पाऊस सुरु होईपर्यंत पाण्याची गरज शिल्लक पाणीसाठ्यामधून निश्चितच भागवली जाणार असून 1 जून 2017 पासून वीजनिर्मिती साठीचे पाणी वापर नवीन वर्षाप्रमाणे नियमितपणे सुरु हाईल. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा 100.25 टीएमसी आहे, असेही अधीक्षक अभियंत्यांनी स्पष्ट् केले आहे.

Web Title: Koyna dam phase four power generation stoped