कोयना धरणातुन नदीपात्रात सोडले पाणी

हेमंत पवार 
मंगळवार, 17 जुलै 2018

महाराष्ट्राची वरदायीनी ठरलेल्या पाटण तालुक्यातील कोयना धरणातुन आज मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास धरणाच्या सहा वक्र दरवाजातुन 2 फुटाने पाणी सोडण्यात आले.

कोयनानगर - महाराष्ट्राची वरदायीनी ठरलेल्या पाटण तालुक्यातील कोयना धरणातुन आज मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास धरणाच्या सहा वक्र दरवाजातुन 2 फुटाने पाणी सोडण्यात आले.

यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच धरणातुन 5 हजार 588 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. दरम्यान आज सकाळी आठ वाजता धरणाच्या पायथा वीजगृहातुन 2 हजार 100 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीही मोठी वाढ झाली आहे.

पावसाचा जोर कायम असल्याने धरणातुन पाणी सोडण्याचा निर्णय़ कोयना धरण प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान प्रशासनाने कोयना-कृष्णा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत.

Web Title: in koyna dam realese water