कोयना धरणातून  आज पाणी सोडणार?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

कोयना धरणात ८४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडून पाणीपातळी नियंत्रित करण्याचा दुसरा टप्पा २४ तासांत सुरू होण्याची शक्‍यता आहे.

कोयनानगर - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग आठवा दिवस मुसळधार पावसाचाच ठरला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात चार टीएमसीने वाढ झाली. कोयना धरणात ८४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडून पाणीपातळी नियंत्रित करण्याचा दुसरा टप्पा २४ तासांत सुरू होण्याची शक्‍यता आहे. मुसळधार पाऊस व भारत संचार निगमच्या अनागोंदी कारभारामुळे कोयना धरण परिसर गेले २४ तास संपर्कहीन झाला आहे. त्यामुळे पूरनियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन कोलमडले आहे.

धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत कोयनानगरला १६५ मिलिमीटर, नवजा येथे १४७ व महाबळेश्वरला २४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसाने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ४५ हजार ७७४ क्‍युसेक झाली आहे. त्यामुळे धरण साठ्यात चार टीएमसीने वाढ झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Koyna Dam release water today