मातीउपशाने कोयना नदीकाठ पोखरला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

कऱ्हाड - माती उत्खननासाठी अक्षरशः कोयना नदीकाठ पोखरला आहे. नदीपासून जवळच मोठ्या प्रमाणात माती उपसा करण्यात येत आहे. पश्‍चिम सुपने, साकुर्डी गावच्या हद्दीत कोयना नदीकाठची झाडेही जेसीबीने पाडण्यात येत आहेत. त्यामुळे संबंधितांवर कोणाचा अंकुश आहे की नाही अशीच स्थिती सध्या झाली आहे. त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा तिकडे फिरकतही नाही. 

त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनीच नदीकाठची पाहणी करून पोखरला जात असलेला नदीकाठ वाचवावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

वीट तयार करण्यासाठी नदीकाठची तांबडी माती वापरली जाते. कृष्णा-कोयना नदीकाठी तांबडी माती मोठ्या प्रमाणात असते. दर वर्षी ती माती विटा तयार करण्यासाठी उपसा केली जाते. मात्र, दर वर्षी पावसाळ्यात येणाऱ्या पुराच्या पाण्याने नदीकाठी माती उपसा करताना पडलेले खड्डे भरून जातात आणि नदीपात्र पूर्वपदावर येते. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांपासून मोठा पूर आलेला नाही. त्यातच सातत्याने माती उपसा सुरू असल्याने नदीकाठ धोक्‍यात आला आहे. तांबवे गावाजवळून वाहणाऱ्या कोयना नदीपात्रालगतच साकुर्डी व पश्‍चिम सुपने गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात माती उपसा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. 

शासनाच्या नियमानुसार नदीजवळच माती उपसा करता येतो का? याचीही तपासणी केली जात नाही. त्यातच गेल्या दोन दिवसांत माती उपसा करण्यासाठी नदीकाठची झाडेही जेसीबीने राजरोसपणे पाडण्यात येत आहेत.

त्याकडे संबंधित नियंत्रण ठेवणारी यंत्रणा बघायलाही तयार नसल्याचे 
दिसते. त्यामुळे माती उपसा करणाऱ्यांचे साधते आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीच आता या अमर्याद माती उपशावर निर्बंध आणून नदीपात्र वाचावावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. 

ताळतंत्रच नाही 
माती उपसा आणि वाहतूक कधी करावी याला काही ताळतंत्रच राहिलेले नाही. त्यामुळे मातीचा दिवस- रात्र उपसा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. त्याचा तांबवे ते तांबवे फाटा आणि कऱ्हाड-पाटण रस्त्यावरील वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मातीचे उत्खनन नेमके किती? 
शासनाच्या नियमाप्रमाणे सुमारे तीन मीटरपर्यंतच संबंधित जमीन मालकाचा अधिकार असतो. त्याखाली शासनाची जमीन असते असे सांगितले जाते. कोयना नदीकाठी मोठ्या प्रमाणात उपसा करून शासनाच्या नियमाची पातळी कधीच ओलांडली आहे. मातीचे किती उत्खनन करण्यात आले, त्याची तपासणीच अद्याप संबंधित यंत्रणेमार्फत करण्यात आलेली नाही.    

Web Title: Koyna River Edge soil digging