सांगली- जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी बैठकीत ठरल्याप्रमाणे एकरकमी एफआरपी द्यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. संघटनेने शुक्रवारी कारखान्यांच्या गवाणीत उड्या टाकण्याचा इशारा दिला आहे. एकीकडे हा इशारा दिला असतानाच आज पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरूण लाड यांच्या क्रांती कारखान्याचे घोगाव (ता. पलूस) येथील विभागीय कार्यालय अज्ञातांनी पेटवून दिल्याचा प्रकार घडला. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत झालेल्या बैठकीत एकरकमी एफआरपी देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे संघटनेने आंदोलन स्थगित केले. परंतू कारखाने सुरू होऊन दोन महिने उलटले तरी तीन कारखान्यांचा अपवाद वगळता इतर कारखान्यांनी तुकड्यामध्ये एफआरपी देण्यास सुरवात केली आहे. इतर कारखान्यांनी पहिला हप्ता 2500 रूपयाने देण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी काही कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून संमतीपत्र घेतली आहेत.
यंदाही एफआरपीचे तुकडे पाडले गेल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना ऐन हंगामात आक्रमक झाली आहे. त्यानी एकरकमी एफआरपीसाठी गवाणीत उड्या टाकण्याचे आंदोलन जाहीर केले आहे. तत्पूर्वी मंगळवारी मध्यरात्रीनंतर घोगाव येथे क्रांती कारखान्याचे विभागीय कार्यालय पेटवून दिल्याचा प्रकार घडला आहे. स्वाभिमानी संघटनेने आंदोलन केल्याची चर्चा असली तरी जिल्हाध्यक्ष खराडे यांनी इन्कार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कार्यालय पेटवले असावी अशीच चर्चा आहे.
""पदवीधर निवडणुकीच्या प्रचारात आमदार लाड यांनी एकरकमी एफआरपी देण्याचे कबुल केले होते. परंतू विजयी झाल्यानंतर त्यांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी घोगाव येथील कार्यालय पेटवून दिल्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे कार्यालय पेटवले नाही. मात्र आमचे सनदशीर मार्गाने एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन सुरूच राहणार आहे. शुक्रवारी गवाणीत उड्या टाकण्याचे आंदोलन केले जाईल.''
- महेश खराडे (जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना)