क्रांतिसिंहांची बनणार शॉर्ट फिल्म

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

सांगली - क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनातील प्रसंगांवर राज्यस्तरीय शॉर्ट फिल्म्‌ स्पर्धा होणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठानतर्फे पुण्यतिथीनिमित्त स्पर्धा घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती ॲड. के. डी. शिंदे, योगेश पाटील, प्रशांत पवार, आबा पाटील यांनी दिली. 

सांगली - क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनातील प्रसंगांवर राज्यस्तरीय शॉर्ट फिल्म्‌ स्पर्धा होणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठानतर्फे पुण्यतिथीनिमित्त स्पर्धा घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती ॲड. के. डी. शिंदे, योगेश पाटील, प्रशांत पवार, आबा पाटील यांनी दिली. 

ते म्हणाले, ‘‘प्रतिष्ठानतर्फे गत वर्षी क्रांतिसिंहांचा जीवनपट दाखवणारे संकेतस्थळ तयार करण्यात आले. त्यात क्रांतिसिंहांचा जीवनपट, दुर्मिळ साहित्य, छायाचित्रांचा समावेश आहे. क्रांतिसिंहांची जीवनप्रणाली तरुणाईला आदर्शवत ठरेल, असे त्यात सांगण्यात आले आहे. तसेच प्रबोधनाच्या माध्यमातून क्रांतिसिंहांची ओळख तरुणाईपर्यंत पोहोचवली जात आहे.

यंदाच्या वर्षी अनोखी स्पर्धा घेण्यात येत आहे. क्रांतिसिंहांच्या जीवनातील प्रसंगांवर शॉर्ट फिल्म्‌ स्पर्धा होणार आहे. फिल्म तयार करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला जाईल. दीडपासून वीस मिनिटांपर्यंत ही फिल्म बनवता येणार आहे. यातून क्रांतिसिंहांचे चरित्र तरुणाला आत्मसात होईल. मंगळवारी (ता.६) सकाळी ९.३० वाजता विश्रामबाग येथील पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादनाचा कार्यक्रम होईल. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची उपस्थिती असेल. तरुणाईनेही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.’’

एक हजार व्याख्याने 
क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठानचे योगेश पाटील यांनी यंदाच्या वर्षी एक हजार व्याख्याने देण्याचा संकल्प केला आहे. मंगळवारी (ता.६) शांतिनिकेतन लोकविद्यापीठातून व्याख्यानाला सुरवात होईल. वर्षभर विविध महाविद्यालये, शाळांत व्याख्याने होणार आहेत. 

Web Title: krantisinh nana patil small film