#SangliFlood डिग्रज, दुधगाव, माळवाडीतील ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर 

#SangliFlood डिग्रज, दुधगाव, माळवाडीतील ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर 

तुंग - मिरज पश्चिम भागातील आठही गावांना कृष्णा व वारणेच्या पुराचा तडाखा बसला आहे. मौजे डिग्रज व माळवाडी (ता. मिरज) या गावांना सर्वाधिक फटका बसला आहे.  मौजे डिग्रजमध्ये एनडीआरएफच्या मदतीने 150 कुटुंबांना येथील शाळेत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. माळवाडीमध्ये वारणेचे पाणी शिरल्याने येथील ग्रामस्थांना जनावरांच्यासह अन्यत्र हलवले आहे.

जुन्या सावळवाडीत अडकलेली विश्रांत कोळी, शांतीनाथ तेरदाळे, संजय दळवी, विनोद पाचोरे यांची 60 जनावरे यांत्रिक बोटीच्या मदतीने बाहेर काढली. दुधगावमध्ये कुंभार गल्ली, बिरोबा गल्ली, कुदळे मळा, मोरे गल्लीसह दुधेश्वरमंदिरात  पुराचे पाणी शिरले आहे . या सर्व भागातील 250 कुटुंबाचे स्थलातंर केले आहे. त्यांना गावातील शाळा हायस्कुल येथे ठेवले आहे. तेथे  गावातील तरूण मंडळाकडून त्यांची जेवणाची सोय केली आहे.

-  मदन यादव, ग्रामविकास अधिकारी  

कवठेपिरानमध्ये महादेव मंदिरात पाणी शिरले असून गावातील ग्रामपंचायतीजवळ पाणी आले आहे. येथील वीज वितरण कार्यालय पाण्याने वेढल्याने विद्युतपुरवठा बंद केला आहे.  गावातील 120 कुटुंबांची जिल्हा परिषद शाळेत राहण्याची सोय  केली आहे. कसबेडिग्रज येथील मुख्य चौकासह कोळीवाडा, सिद्धार्धनगर या भागात  पाणी आले आहे. येथील 100 ते 125 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. 

बागडीवस्ती येथील लोकांना जि. प. शाळा व आश्रम शाळेत राहण्याची सोय केली आहे. सांगलीवाडी  रस्त्यावर फरशीपुलावर पाणी आल्याने तुंग, कसबे डिग्रज, कवठेपिरान, दुधगाव, समडोळी या गावाचा सांगलीशी संपर्क तुटला आहे.

60  जित्राबांना वाचवले
जुन्या सावळवाडीमध्ये जनावरांचा गोटा होता. पुराचे पाणी येणार नाही म्हणुन मालकांनी दुर्लक्ष केले, पण पाणी गतीने गोट्यापर्यत आल्यावर मात्र त्याचा धीर सुटला. गावातील विजय मसुटगे, योगेश चौधरी, इक्बाल तांबोळी, सुनिल दणाणे, मनोज ऐतवाडे यांनी बोटीतून 60 जनावरांना जीवदान दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com