सांगलीत कृष्णा धोक्याच्या पातळीवर

सकाळ वृत्‍तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

सांगलीत कृष्णा नदीचे पातळीत वाढ झाली असून आज सकाळी आयर्विन पुलाजवळ पाण्याची पातळी पंचेचाळीस होते पुराचे पाणी  शिवशंभू चौकात आल्यामुळे सांगली इस्लामपूर मार्ग आज सकाळपासून बंद करण्यात आला. कोयना आणि वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे महापुराचा धोका आणखी गडद झाला आहे त्यामुळे प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मदत करत गुंतली आहे काल रात्रीपासूनच महापालिका क्षेत्रातील अनेक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

सांगली - सांगलीत कृष्णा नदीचे पातळीत वाढ झाली असून आज सकाळी आयर्विन पुलाजवळ पाण्याची पातळी पंचेचाळीस होते पुराचे पाणी  शिवशंभू चौकात आल्यामुळे सांगली इस्लामपूर मार्ग आज सकाळपासून बंद करण्यात आला. कोयना आणि वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे महापुराचा धोका आणखी गडद झाला आहे त्यामुळे प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मदत करत गुंतली आहे काल रात्रीपासूनच महापालिका क्षेत्रातील अनेक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

सांगलीत काल दिवसभर झालेल्या पावसामुळे तसेच कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद 90 हजार क्युसेक्स पर्यंत वाढण्यात आल्यामुळे नदीचे पाणी पातळी वाढतच आहे. कृष्णा नदीने काल सकाळी इशारा पातळी ओलांडली होती तर आज सकाळी पाणी पातळी धोक्याच्या पातळीवर पोहोचली त्यामुळे दुपारपर्यंत पाणी आणखी काही उपनगरांमध्ये घुसण्याची शक्यता आहे.

नदीच्या जवळ असलेल्या सिद्धार्थ परिसर राजीव गांधी नगर मारुती चौक टिळक स्मारक चौक या भागाला पुराचा धोका निर्माण झाला आहे. तसेच कर्नाळ रोड वरील शिवशंभु चौकातही आज सकाळी पाणी आले त्यामुळे नवीन पुलावरून सुरू असणारी सांगली इस्लामपूर वाहतूक बंद करण्यात आली.  त्यामुळे पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांना तासगाव कराड मार्गे जावे लागत आहे.

महापौर संगीता खोत, आयुक्त नितीन कापडणीस यांनी सकाळपासूनच पूरग्रस्त भागातील नागरिकांना भेट देऊन सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले. महापालिकेचे सर्व विभाग अधिकारी आणि कर्मचारी पूरग्रस्त भागातील मदतकार्यात गुंतले आहेत महापौर संगीता खोत यांनी स्वतः पूरग्रस्तांची  भेट घेऊन  चौकशी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Krishna River Flood Water Rain