कृष्णेच्या पाण्याचे उन्हाळी नियोजन करा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

सांगली - मदनभाऊ युवा मंचच्या वतीने उन्हाळ्यासाठी कृष्णा नदीपात्रातील पाणी प्रवाहाचे समतोल नियोजन करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. 

सांगली - मदनभाऊ युवा मंचच्या वतीने उन्हाळ्यासाठी कृष्णा नदीपात्रातील पाणी प्रवाहाचे समतोल नियोजन करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. 

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात घरगुती व्यावसायिक वापराच्या गॅसची दरवाढही कमी करावी, अशा आशयाचा प्रस्ताव शासनाकडे द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. मंचचे अध्यक्ष संतोष पाटील, उत्तम साखळकर, आनंद लेंगरे, प्रकाश मुळके, सतीश पवार आदींनी हे निवेदन दिले. दरवर्षी उन्हाळ्यात कोयनेतून पाणी सोडताना नियोजन कोलमडल्याने नदीपात्र कोरडे पडते. त्यामुळे शहराबरोबरच परिसरातील गावांनाही पाणीटंचाई भेडसावते. तरी यंदा पुरेशी खबरदारी घ्यावी. त्यासाठी योग्य यंत्रणांची बैठक व्हावी. तसेच घरगुती गॅस ६७२ रुपयांवरून ७६२, तर व्यावसायिक गॅसची दरवाढ १२७३ वरून १४२५ रुपये केली आहे. ती तातडीने रोखली जावी. ही दरवाढ निषेधार्ह आहे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Krishna River Water Planning Summer